नशिब- कुणाला हसवतं, कुणाला फसवतं...
कुणाला नाचवतं, कुणाला खचवतं..
कधी डोळ्यात पाणी येईपर्यंत हसवणारे क्षण देतं..
तर कधी डोळ्यातलं पाणी संपत नाही इतकं रडवतं...
कितीही कणखर राहिलात तरी त्याचा इंगा ते दाखवतंच.. तुमची हुषारी, मेहनत, लगन सगळं मग त्याच्यापुढे फिकं पडतं...
तुमचं उद्देश्य, आशा-आकांक्षा, त्याच्यासाठी क्षुल्लक असतं..
नशिबात नसेलच तर क्षणात सगळ्याचा चुथडा करुन टाकतं.
कुणाकुणाचं खूपच छान असतं, पात्रता नसतानाही खूप काही देत असतं,
आपण फक्त पहायचं असतं, कारण आपल्या हाती काहीच नसतं...