Friday, 8 June 2012

'जाणं'..


काही लोक आपल्या आयुष्यात येतात.. पण क्षणभरासाठीच!! आणि अचानक निघूनही जातात.. न विचारता.. कुठेतरी किंवा कायमचेच! आपण मात्र उगीच जीव लाऊन बसतो! तसं तर सगळ्यांनाच माहित असतं, आयुष्य क्षणभंगुर असतं ते ! लोक येतात, जातात.. त्यांच्या आठवणी कधी पुसट तरी कधी ठळक होत असतात.. ज्यांना आठवतही नसतो आपण, त्यांच्या साठी आपले डोळे मात्र वाहात राहतात..
त्या रस्त्यावर.. त्या फोटों'मध्ये' आणि 'मागे' त्या सर्व आठवणी घुटमळत राहतात.. अचानक कधीतरी ते रस्ते आपल्या पायाखालून जात असतात आणि ते फोटो आणि त्यांच्या बरोबर ओघानं येणाऱ्या त्यांच्या त्या आठवणी खाडकन डोळ्यासमोर येतात.. आणि तेंव्हाचा एक अन एक क्षण आत्ता जगू लागतात..
ती लोकं..  लोकं नव्हे, एकेकाळचे आपले जिवलग न सांगताच.... .....!
काही जवळ असूनही आता आपले नसतात, काही जवळ असतात, आपलेही असतात पण जिवलग नसतात..  तर काही जवळ असतात पण आपलेही नसतात आणि जिवलगही !!
कधीतरी जुन्या mobile  मधल्या images, messages अचानक उघडल्यावर असं होतं..!! कोणाबरोबर काही क्षण, काही दिवस तर कोणाबरोबर काही महिने, वर्षे घालवलेली असतात असे ते आपले, परके सगळेच असतात त्यात.. कोणाबरोबर तर आयुष्य आणि त्याची स्वप्ने पाहिलेली असतात, कोणाबरोबर आयुष्याचा अर्थ कळलेला असतो! ..पण 'जाणं' कोणीच थांबवू शकत नाही.. थांबवूही नाही.. कारण जाणारे जातातच आणि येणारेही येतच राहतात.. पुन्हा जाण्यासाठी किंवा थांबण्यासाठी..


Tuesday, 20 March 2012

Because of you..


Dedicated to 'the one' who has been my Mentor.. my Idol who changed my life... !




Because of you I could think out of the box..
Because of you I could learn how to talk and walk..


Because of you I could understand my inner potential & qualities..
also how to comply with duties and responsibilities..

It is you, who always motivated me, guided me and taught me so many things through your talks and through your silence too..
Because of you, I could understand, life has brighter side too ..

Because of you I could learn how to give and forgive..
also, how to accept and digest..!

Because of you I could understand-
'how to face failed innings'
and it's again you, who taught-
'how to take success and winnings'!!

Because of you I could learn how to read mind..
and also, how to be sooo kind..

When you advise, you are like my father..
When you care, you are like my mother..
When you share, you are my friend..
But when you don't do this, it's just 'the end'..

It's you who drew my life..
There are very few, who are alike..
__________________________________________________________________________________



Saturday, 17 March 2012

कधी कधी असं वाटतं..

कधी कधी असं वाटतं गेलेला वेळ परत मागावा देवाकडे .. मागे जाऊन change  कराव्याश्या वाटतात बिघडलेल्या गोष्टी.. पण आपण यातलं कधीच काहीच करू शकत नाही ..
अशा वेळी गर्दीत जाऊन एकट्यानं एक फेरफटका मारावा.. पण सगळ्यांमध्ये असतानाही जेंव्हा एकटं वाटू लागतं तेंव्हा समजावं की 'तो'च आपलं 'सगळं' काही झाला आहे..
अश्या वेळी फक्त तोच हवा असतो, एकांतात बसून त्याचा हात हातात घ्यायचा असतो; त्यालाही असंच वाटावं असही वाटतं.. पण तो भेटणार नसेल तर मात्र कुणालाच भेटू नाही असं वाटतं.. मग आयुष्य खूप कांटाळवाणं वाटू लागतं.. त्या वेलीवरची फुलेही कोमेजलेली वाटू लागतात.. माणसं म्हणजे 'गर्दी' वाटू लागते.. भूक लागली असूनही, नाही लागलीये असं वाटतं.. काही सुद्धा नको वाटतं.. आपण कोणाशी आणि कोणी आपल्याशी बोलू नाही असं वाटतं..  धो-धो पाउस पडावा असंही वाटतं.. एकटं कुठेतरी जाऊन ढसाढसा रडावसं वाटतं.. रडतोही आपण!
पण इतक्यात त्याचा phone येतो.. 'भेटायचं' म्हणतो.. आणि मग..
राहिलेलं रडणं त्याच्या मिठीत होतं.. आणि तेंव्हा कुठे मन शांत होतं.. आणि अचानक जगाचं रुपच पालटतं.. कोमेजलेली फुलेही मग उमललेली वाटतात.. गर्दीमध्ये आपल्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागते.. आणि मग सगळंच सुंदर वाटू लागतं.. खूप..
'खूप जास्त'!

Wednesday, 22 February 2012

कटू सत्य!



Reality 'face' करणं, 'FACT accept' करणं हे आता खूप अंगवळणी पडलंय नाही का आपल्या?
रोज नवीन घटना आईकायला मिळतात, आणि आपला काय संबंध म्हणून चर्चा करून, चिघळून चोथा करून रीतसरपणे विसार्ल्याही जातात..
काही facts :
एकेकाळी mobile हा फक्त श्रीमंत लोकांकडेच असू शकतो असा वाटत असतानाच ७-८ वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातातही तो दिसू लागला. वस्तू स्वस्त झाल्या का लोक श्रीमंत?
एकेकाळी आजोबा आणि बाबांच्या तोंडून 'month -end' हा शब्द दर महिन्याला आईकू यायचा आणि त्यामुळे अडीच रुपयांचं आईसक्रीम सुद्धा २३-२४ तारखेनंतर मागणं आपोआप बंद व्हायचं..!
पण आता मुलांचा पॉकेट मनी च एखाद्या गरीब माणसाच्या पगार इतका झालाय. दहावी-अकरावी च्या मुलांच्या हातात क्रोनोग्राफ ची घड्याळे टिकटिकताना दिसतात.. डॉक्टर , दुकानदारही तुमच्या गळ्यातला IT कंपनी चा पट्टा पाहून बिलं फाडताना दिसतात..
मला आठवतंय, माझ्या जॉबची पहिली २ वर्षे मी सायकल वरून जायचे, पण आता १६ वर्षे पूर्ण झाली की आई वडील मुलांना परीक्षेत चांगले मार्क पडण्याच्या बदल्यात Activa Karizma ची स्वप्ने दाखवतात.. Costa Coffee , Barista , Cafe coffee day च्या outlets वर collegians ची गर्दी वाढू लागली.. आणि ८० रुपयांची coffee पिण्याइतकी तरुणाई श्रीमंत झाली..
कदाचित पूर्वीची 'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी' ही म्हण हळू हळू लोप पावतेय..
एकीकडे जाणवतंय समाज प्रगत होत चाललाय, भारत 'developing Country ' झालाय.. वाडे नष्ट होऊन बिल्डींग्स उभ्या राहिल्याय्त, दर चौथ्या- पाचव्या इमारतीत कोणीतरी foreign ला चाललाय... एकत्र कुटुंबांची विभक्त कुटुंबे झाली, मुलांना आंगण, माजघर, आजीच्या गोष्टी, विटी-दांडू, पाणी तापवण्याचा बंब, पिंप, कोब्याची फरशी, सोवळं-ओवळं, तिन्हीसांज, शुभंकरोती ह्या आणि अश्या शब्दांची आठवणही नाही राहिली. कमी पैशात काटकसर करून भागावण्यातला आनंदही हरवून गेलाय.. पूर्वी दहा पंधरा भावंडांच्या गोतावळ्यात दिवसाची सांज कधी व्हायची पत्ता लागत नसेल आणि आता इन मीन दोन असूनही त्यांना एकमेकांना भेटायला वेळ होत नाही.. तेंव्हा २ खोल्यांमध्ये ७-८ जण राहायचे पण आता ४ जणांना पण privacy लागते.. पूर्वी कुठे होते 'Mother 's day , father 's day आणि valentine 's day ? प्रेम तर तेंव्हाही होतंच नं! इंग्लिश culture च्या नावाखाली मातृभाषेला विसरू लागलेयत; माझा मुलगा/ मुलगी 'मराठी मिडीयम' मध्ये जातो/ जाते हे सांगायला आता आम्हाला लाज वाटते आणि त्याचं किंवा तिचं शिक्षण बाजूला राहून आपला 'Status symbol' जास्त महत्वाचा झालाय.

fact आहे! कटू सत्य!
पण कोणीही काहीही म्हणो, तीच fact कुठेतरी तुम्ही आम्ही accept केली आहे नाही का? आणि आपलं आयुष्य दुखी करून घेतलं आहे..
आणि हेच कारण आहे पूर्वी psychiatrists , family courts नसण्याचं!! जाणवतं मग- जुनं तेच सोनं!
करूयात का मग आपण सगळेच प्रयत्न जुनं टिकवून नवीन स्वीकारण्याचा?







Tuesday, 21 February 2012

...and then you just smile!


Have you ever thought of doing different things.. rather doing stupid things..?
Yes, you must have; as everyone does.. 
Sometimes you try to do  something nonsense and just smile when you yourself realize how stupid it was to do!
You look at the sky and think of mapping up the distance.. and then you just smile on your stupid thought..
You look at the sea till the edge where it meets the sky  and think what will be it's distance and depth and then again you just smile because it's immeasurable..
You look at the scorching Sun and desire to challenge your vision against his blaze but then you just smile and leave it..

You also look at those shining stars in the sky and try to count them and when 
you fail to do   so, you just smile..
You look at colorful flowers and just smile when you are surprised to see the

beauty of nature..
When you grow up and look at kids, you just smile because you realize that you can never acquire your childhood back..
Sometimes you play with your own shadow and make different shapes and then just smile when you realize someone is looking at you strangely..
You smile when you stand up on a high crag of a mountain and find yourself tiny 

against this whole world..


You think of lot of such things, write it down and then you just smile because you do not know why are you doing so.. and so am I..!!