कधी कधी असं वाटतं गेलेला वेळ परत मागावा देवाकडे .. मागे जाऊन change कराव्याश्या वाटतात बिघडलेल्या गोष्टी.. पण आपण यातलं कधीच काहीच करू शकत नाही ..
अशा वेळी गर्दीत जाऊन एकट्यानं एक फेरफटका मारावा.. पण सगळ्यांमध्ये असतानाही जेंव्हा एकटं वाटू लागतं तेंव्हा समजावं की 'तो'च आपलं 'सगळं' काही झाला आहे..
अश्या वेळी फक्त तोच हवा असतो, एकांतात बसून त्याचा हात हातात घ्यायचा असतो; त्यालाही असंच वाटावं असही वाटतं.. पण तो भेटणार नसेल तर मात्र कुणालाच भेटू नाही असं वाटतं.. मग आयुष्य खूप कांटाळवाणं वाटू लागतं.. त्या वेलीवरची फुलेही कोमेजलेली वाटू लागतात.. माणसं म्हणजे 'गर्दी' वाटू लागते.. भूक लागली असूनही, नाही लागलीये असं वाटतं.. काही सुद्धा नको वाटतं.. आपण कोणाशी आणि कोणी आपल्याशी बोलू नाही असं वाटतं.. धो-धो पाउस पडावा असंही वाटतं.. एकटं कुठेतरी जाऊन ढसाढसा रडावसं वाटतं.. रडतोही आपण!
पण इतक्यात त्याचा phone येतो.. 'भेटायचं' म्हणतो.. आणि मग..
राहिलेलं रडणं त्याच्या मिठीत होतं.. आणि तेंव्हा कुठे मन शांत होतं.. आणि अचानक जगाचं रुपच पालटतं.. कोमेजलेली फुलेही मग उमललेली वाटतात.. गर्दीमध्ये आपल्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागते.. आणि मग सगळंच सुंदर वाटू लागतं.. खूप..
'खूप जास्त'!

छान लिहिला आहेस !!
ReplyDeleteThanks Amey
ReplyDelete