काही लोक आपल्या आयुष्यात येतात.. पण क्षणभरासाठीच!! आणि अचानक निघूनही जातात.. न विचारता.. कुठेतरी किंवा कायमचेच! आपण मात्र उगीच जीव लाऊन बसतो! तसं तर सगळ्यांनाच माहित असतं, आयुष्य क्षणभंगुर असतं ते ! लोक येतात, जातात.. त्यांच्या आठवणी कधी पुसट तरी कधी ठळक होत असतात.. ज्यांना आठवतही नसतो आपण, त्यांच्या साठी आपले डोळे मात्र वाहात राहतात..
त्या रस्त्यावर.. त्या फोटों'मध्ये' आणि 'मागे' त्या सर्व आठवणी घुटमळत राहतात.. अचानक कधीतरी ते रस्ते आपल्या पायाखालून जात असतात आणि ते फोटो आणि त्यांच्या बरोबर ओघानं येणाऱ्या त्यांच्या त्या आठवणी खाडकन डोळ्यासमोर येतात.. आणि तेंव्हाचा एक अन एक क्षण आत्ता जगू लागतात..
ती लोकं.. लोकं नव्हे, एकेकाळचे आपले जिवलग न सांगताच.... .....!
काही जवळ असूनही आता आपले नसतात, काही जवळ असतात, आपलेही असतात पण जिवलग नसतात.. तर काही जवळ असतात पण आपलेही नसतात आणि जिवलगही !!
कधीतरी जुन्या mobile मधल्या images, messages अचानक उघडल्यावर असं होतं..!! कोणाबरोबर काही क्षण, काही दिवस तर कोणाबरोबर काही महिने, वर्षे घालवलेली असतात असे ते आपले, परके सगळेच असतात त्यात.. कोणाबरोबर तर आयुष्य आणि त्याची स्वप्ने पाहिलेली असतात, कोणाबरोबर आयुष्याचा अर्थ कळलेला असतो! ..पण 'जाणं' कोणीच थांबवू शकत नाही.. थांबवूही नाही.. कारण जाणारे जातातच आणि येणारेही येतच राहतात.. पुन्हा जाण्यासाठी किंवा थांबण्यासाठी..
aagadi perfect thought aahe, loka yetat ani jatat, pan kahich loka ayushyabharachya athavani deun jatat.
ReplyDeleteSunderrr....Apratim Vichar!!
ReplyDeleteThanks Shirish and Siddharth..
ReplyDelete