Reality 'face' करणं, 'FACT accept' करणं हे आता खूप अंगवळणी पडलंय नाही का आपल्या?
रोज नवीन घटना आईकायला मिळतात, आणि आपला काय संबंध म्हणून चर्चा करून, चिघळून चोथा करून रीतसरपणे विसार्ल्याही जातात..
काही facts :
एकेकाळी mobile हा फक्त श्रीमंत लोकांकडेच असू शकतो असा वाटत असतानाच ७-८ वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातातही तो दिसू लागला. वस्तू स्वस्त झाल्या का लोक श्रीमंत?
एकेकाळी आजोबा आणि बाबांच्या तोंडून 'month -end' हा शब्द दर महिन्याला आईकू यायचा आणि त्यामुळे अडीच रुपयांचं आईसक्रीम सुद्धा २३-२४ तारखेनंतर मागणं आपोआप बंद व्हायचं..!
पण आता मुलांचा पॉकेट मनी च एखाद्या गरीब माणसाच्या पगार इतका झालाय. दहावी-अकरावी च्या मुलांच्या हातात क्रोनोग्राफ ची घड्याळे टिकटिकताना दिसतात.. डॉक्टर , दुकानदारही तुमच्या गळ्यातला IT कंपनी चा पट्टा पाहून बिलं फाडताना दिसतात..
मला आठवतंय, माझ्या जॉबची पहिली २ वर्षे मी सायकल वरून जायचे, पण आता १६ वर्षे पूर्ण झाली की आई वडील मुलांना परीक्षेत चांगले मार्क पडण्याच्या बदल्यात Activa Karizma ची स्वप्ने दाखवतात.. Costa Coffee , Barista , Cafe coffee day च्या outlets वर collegians ची गर्दी वाढू लागली.. आणि ८० रुपयांची coffee पिण्याइतकी तरुणाई श्रीमंत झाली..
कदाचित पूर्वीची 'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी' ही म्हण हळू हळू लोप पावतेय..
एकीकडे जाणवतंय समाज प्रगत होत चाललाय, भारत 'developing Country ' झालाय.. वाडे नष्ट होऊन बिल्डींग्स उभ्या राहिल्याय्त, दर चौथ्या- पाचव्या इमारतीत कोणीतरी foreign ला चाललाय... एकत्र कुटुंबांची विभक्त कुटुंबे झाली, मुलांना आंगण, माजघर, आजीच्या गोष्टी, विटी-दांडू, पाणी तापवण्याचा बंब, पिंप, कोब्याची फरशी, सोवळं-ओवळं, तिन्हीसांज, शुभंकरोती ह्या आणि अश्या शब्दांची आठवणही नाही राहिली. कमी पैशात काटकसर करून भागावण्यातला आनंदही हरवून गेलाय.. पूर्वी दहा पंधरा भावंडांच्या गोतावळ्यात दिवसाची सांज कधी व्हायची पत्ता लागत नसेल आणि आता इन मीन दोन असूनही त्यांना एकमेकांना भेटायला वेळ होत नाही.. तेंव्हा २ खोल्यांमध्ये ७-८ जण राहायचे पण आता ४ जणांना पण privacy लागते.. पूर्वी कुठे होते 'Mother 's day , father 's day आणि valentine 's day ? प्रेम तर तेंव्हाही होतंच नं! इंग्लिश culture च्या नावाखाली मातृभाषेला विसरू लागलेयत; माझा मुलगा/ मुलगी 'मराठी मिडीयम' मध्ये जातो/ जाते हे सांगायला आता आम्हाला लाज वाटते आणि त्याचं किंवा तिचं शिक्षण बाजूला राहून आपला 'Status symbol' जास्त महत्वाचा झालाय.
fact आहे! कटू सत्य!
पण कोणीही काहीही म्हणो, तीच fact कुठेतरी तुम्ही आम्ही accept केली आहे नाही का? आणि आपलं आयुष्य दुखी करून घेतलं आहे..
आणि हेच कारण आहे पूर्वी psychiatrists , family courts नसण्याचं!! जाणवतं मग- जुनं तेच सोनं!
करूयात का मग आपण सगळेच प्रयत्न जुनं टिकवून नवीन स्वीकारण्याचा?
India Shining aahe madam
ReplyDeleteThanks Swapnil :-)
ReplyDeleteखूप मस्त लिहिले आहेस.... सर्वांच्या मनातील शब्दात उतरले....
ReplyDeleteThanks Rohit
ReplyDelete